Lakhat Ek Aamcha Dada: २० किलोंची पालखी आणि साजशृंगार; नितीश चव्हाणने कसा शूट केला यात्रेचा ‘तो’ सीन? वाचा…

0
20
Lakhat Ek Aamcha Dada: २० किलोंची पालखी आणि साजशृंगार; नितीश चव्हाणने कसा शूट केला यात्रेचा ‘तो’ सीन? वाचा…


कसा शूट केला हा सीन?

या सीनबद्दल बोलताना नितीश चव्हाण म्हणाला की, ‘जेव्हा मला कळलं की, यात्रेमधला असा एक सीन करायचा आहे, तेव्हापासून मनात धाकधूक चालू होती. हा सीन कसा होईल, काय वेगळं करता येईल, हे विचार सतत डोक्यात चालू होते. जेव्हा तो दिवस आला, तेव्हापर्यंत मी काहीही ठरवलं नव्हतं. कारण अंगात येणं हे मी आजपर्यंत कधीच अनुभवलं नव्हतं. म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं याची कल्पना नव्हती. जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि तयार होऊन जेव्हा स्वतःला पहिल्यांदा आरशात पाहिलं, ते पाहून माझा आत्मविश्वास वाढला. इतका कमाल लूक पाहून ती भावना जागृत झाली की, मी काहीतरी वेगळं करायला चाललो आहे. यासाठी मला मेकअप दादांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. सीनसाठी मी तयार झालो आणि सर्वात आधी देवीसमोर जाऊन तिचा आशीर्वाद घेतला आणि तिला प्रार्थना केली की, मला माहिती नाही कसं करायचं, काय करायचं, तू माझ्याकडून हे सर्व नीट करून घे.’



Source link