
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत असून पात्र महिलांच्या बँक खात्यात साडे सात हजार रुपये जमा झाले आहेत. त्यातच आता सरकारने राज्यभरातील महिलांना दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप सदर योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे. याआधी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२४ होती.