
Laapataa Ladies Oscar 2025 : किरण रावचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर कॅटेगरीच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवू शकला नाही. मात्र, ब्रिटनमधील आणि भारतीय कलाकार असलेल्या ‘संतोष’ या भारताशी संबंधित दुसऱ्या चित्रपटाची शॉर्टलिस्टमध्ये निवड करण्यात आली आहे. केवळ किरण आणि आमिर खानच नाही तर संपूर्ण देश ही बातमी ऐकून खूप निराश झाला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाची ऑस्करमध्ये निवड होण्यासाठी खूप उत्सुक होता.







