kulgam Encounter | कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
kulgam Encounter | कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान! | Navarashtra (नवराष्ट्र)


कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान!

कुलगाम जिल्ह्यातील (kulgam Encounter) सामनू गावात गुरुवारी दुपारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली, जी शुक्रवारीही सुरूच आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. ताज्या माहितीनुसार येथे पाच दहशतवादी मारले गेले आहेत.

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम (kulgam Encounter) जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच आहे. सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीच्या ठिकाणी पाच दहशतवादी मारले गेले आहेत. मृत दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात सुरक्षा दलांची कारवाई अजूनही सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

कुलगाम जिल्ह्यातील सामनू गावात काही दहशतवादी काही मोठी घटना घडवण्यासाठी जमले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर पोलिस, लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने दहशतवादी उपस्थित असलेल्या गावाला वेढा घातला आणि गुरुवारी दुपारी शोध मोहीम सुरू केली. दुपारी चारच्या सुमारास लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. मधूनमधून गोळीबार सुरू होता त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.






Source link