
‘दरोडेखोर’ या चित्रपटाने कुलदीप पवार यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटामधील रांगडा शेतकरी त्यांनी जसा साकारला, तितक्याच ताकदीने त्यांनी ‘शापित’ चित्रपटातील खलनायकही गाजवला. ‘जावयाची जात’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘खरा वारसदार’ हे त्यांचे मराठी चित्रपट तुफान गाजले. छोट्या पडद्यावरची त्यांची ‘डिटेक्टीव्ह परमवीर’ ही मालिका देखील खूप गाजली होती.







