
मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम सत्तार शेख (वय, २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आणि मुख्य आरोपी सलमा आलासे यांच्या दोघांचे मुले इचलकरंजीच्या कोले मळा येथील एका शाळेत इयत्ता पहिलीत शिकतात. दरम्यान, दुपारच्या सुट्टीत खेळता खेळता सलमा यांच्या मुलाचे शेख यांच्या मुलाशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. यानंतर मृताने सलमा यांच्या मुलाच्या कानशिलात लगावली, याची माहिती सलमाला मिळाली. यानंतर सलामाने तिचा भाऊ शब्बीर अब्दल गवंडी याला बोलावून घेतले.