
यापूर्वी कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरु होती. मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवार या चार दिवशी कोल्हापूर-मुंबई दरम्यान विमान सेवा सुरू होती.मात्र कोल्हापूर व परिसरातून सध्या कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे, एसटी व खासगी वाहनांना खूप वेळ लागत होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून मुंबईला दररोज विमानसेवा सुरु व्हावी, अशी मागणी उद्योजक आणि व्यापारी वर्गातून होत होती. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले आहे.







