Koffee With Karan 8: करण जोहरने दीपिका-रणवीरला काय गिफ्ट दिले? जाणून घ्या गिफ्ट हॅम्परविषयी

0
16
Koffee With Karan 8: करण जोहरने दीपिका-रणवीरला काय गिफ्ट दिले? जाणून घ्या गिफ्ट हॅम्परविषयी


‘कॉफी विथ करण ८’मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. यावेळी दीपिका पदुकोण हिने स्वतःच्या आयुष्यातील एक मोठं सत्य सांगितलं आहे. रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंह याची एंट्री झाली होती. त्यावेळी दीपिका नैराश्याचा सामना करत होती. या नैराश्यातून तिला बाहेर काढण्याचं काम रणवीरने केलं होतं. त्यावेळी रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला होता. मात्र, दीपिकाला पुन्हा रिलेशनशिपमध्ये अडकायचं नव्हतं. त्यामुळे ती या सगळ्याचा फार विचार करत नव्हती. तर, दुसरीकडे रणवीरसोबत असताना देखील आणखी काही लोकांना डेट करत होती. हा खुलासा ऐकून रणवीरही थक्क झाला होता. हे लोक कोण होते, असं विचारताच दीपिका म्हणाली की, आता तिला त्यांची नावं आठवत नाहीत.



Source link