
‘खतरों के खिलाडी १३’मध्ये एकूण १४ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, अर्चना गौतम, अर्जित तनेजा, डेजी शाह, डिनो जेम्स, नायरा बॅनर्जी, रश्मीत कौर, रौहित रॉय, रुही चतुर्वेदी, शीजान खानी, शिव ठाकरे आणि साउंडस मौफकीर हे कलाकार दिसले होते. दक्षिण अफ्रीकेतील केपटाउनमध्ये या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु होते. २ ऑक्टोबरला ते संपल्यावर रोहित शेट्टीने पोस्ट शेअर केली होती. त्याने या पोस्टमध्ये सर्व स्पर्धक आणि प्रेक्षकांचे आभार मानले होते.








