
KBC 15 Latest Episode 1 September 2023: टीव्हीचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १५ सीजन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मागील सीझन्सप्रमाणेच यंदाचा सीझन देखील चांगलाच गाजत आहे. अमिताभ बच्चन होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये एकतरी असा स्पर्धक नक्कीच आहे, ज्याने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन इतिहास रचला आहे. यावेळी शोचा १५वा सीझन सुरू झाला आहे. या सीझनमध्ये असे काही स्पर्धक नक्कीच होते, ज्यांनी एक कोटीचा प्रश्न गाठला. पण, सात कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. मात्र, या सीझनमध्ये एक स्पर्धक हा टप्पा गाठणार आहे. ‘केबीसी १५’ला पहिला स्पर्धक मिळाला आहे, ज्याने ७ कोटींच्या प्रश्नाचा टप्पा गाठला आहे.








