
विद्यार्थिनींना मंगळसूत्रासह कानातले, चेन आणि जोडवे असे दागिने काढण्यास सांगितले होते.
कर्नाटक नागरी सेवा परीक्षेदरम्यान (Karnataka civil services exam Controversy) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटक नागरी सेवा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगण्यात आले. तर, हिजाब परिधान करून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली. या घटनेने नवा वाद निर्माण झाला आहे.
हे सुद्धा वाचा
विद्यार्थिनींना मंगळसूत्रासह कानातले, चेन आणि जोडवे असे दागिने काढण्यास सांगितले होते. त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, जर त्यांना परीक्षा हॉलमध्ये जायचे असेल तर ती कोणतेही दागिने घालू जाता येणार नाही. या सगळ्या वादात भाजपने उडी घेतली असून भारतीय जनता पक्षाचे आमदार बसनगौडा यत्नल यांनी हे पाऊल केवळ हिंदूंसाठी आहे का, असा सवाल केला आहे.










