
या पोस्टसोबत करण जोहरने त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या रिलीजची तारीखही दिली आहे. यावर विकी कौशलनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, ‘आम्ही खूप प्रेम आणि भरपूर मनोरंजन घेऊन येत आहोत, २३ फेब्रुवारी २०२४ रोजी तुम्हा सर्वांना चित्रपटगृहांमध्ये भेटू…’ . दुसरीकडे, करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमीसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.








