
एका मीडिया रिपोर्टमध्ये कंगनाच्या या किसबद्दल लिहिण्यात आले होते. कंगना रनौतने याच रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, ‘हृतिक रोशननंतर मी गरीब वीर दासची इज्जत लुटली? हे कधी घडले?’ यात तिने पुढे हसण्याचे इमोजी देखील टाकले आहेत. २०१६-१७मध्ये हृतिक आणि कंगना यांच्यात जोरदार वाद झाला होता. एवढेच नाही तर, यादरम्यान दोघांमध्ये कायदेशीर वादही झाला. दोघांच्या अफेअरचीही बरीच चर्चा झाली होती, मात्र याला हृतिकने नेहमीच नकार दिला आहे.










