
नुकताच कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट प्रदर्शित झालं आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने १.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, नंतर या चित्रपटाला इतका थंड प्रतिसाद मिळाला की, काही शो थेट कॅन्सल देखील करण्यात आले. कंगनाच्या इतर चित्रपटांविषयी बोलायचे झाले, तर ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.







