
पुण्यातील पोर्शे कार अपघात व त्यानंतर नागपूरमधील घटनेनंतर आता कल्याणमध्ये भरधाव जीपने दोन तरुणींना उडवले आहे. कल्याणच्या रिंग रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने एका दुचाकीला धडक दिली. कल्याणमधील हिट अँड रनच्या केसमध्ये भरधाव जीपने दुचाकीवरून जात असलेल्या दोन तरुणींना धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर जीप चालक तेथून पसार झाला. या घटनेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





