Jharkhand Politics | चंपई सोरेन आज घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; मध्यरात्री घेतली राज्यपालांची भेट | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Jharkhand Politics | चंपई सोरेन आज घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; मध्यरात्री घेतली राज्यपालांची भेट | Navarashtra (नवराष्ट्र)


विधिमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन (Chanpai Soren) यांनी गुरुवारी रात्री राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सरकार स्थापनेसाठी पत्र दिले. राज्यपालांनी त्यांचे पत्र स्वीकारून शपथविधीची परवानगी दिल्याची माहिती आहे.

रांची : विधिमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन (Chanpai Soren) यांनी गुरुवारी रात्री राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांना सरकार स्थापनेसाठी पत्र दिले. राज्यपालांनी त्यांचे पत्र स्वीकारून शपथविधीची परवानगी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी चंपई मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

चंपई यांच्यासोबत किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे अद्याप निश्चित नाही. विशेष असे की, चंपई यांना 10 दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. काँग्रेसचे आमदार आलमगीर आलम यांनी शुक्रवारीच शपथ घेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना गुरुवारी सकाळी ईडीने कोर्टात हजर केले असता त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची रांचीतील होटवार कारागृहात रवानगी करण्यात आली.






Source link