
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. या ठिकाणी मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा यांची वाट पाहत त्या थांबल्या होत्या. त्याच वेळी पापाराझींनी मोठ्याने त्यांचे नाव घेण्यास सुरुवात केली. पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात पाहण्यास सांगत होते. मात्र, त्यावेळी जया बच्चन पुन्हा एकदा मीडियावर वैतागल्या. जया बच्चन पापाराझींना असं काही बोलल्या की, त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला. त्या पापाराझींना ओरडून म्हणाल्या की, ‘मी बहिरी नाही. ओरडू नका आरामात बोला.’







