Jawan: शाहरुखच्या ‘जवान’ची रिलीज डेट येताच इतर चित्रपट मागे हटले! ‘फुकरे ३’चं प्रदर्शन लांबणीवर

0
3
Jawan: शाहरुखच्या ‘जवान’ची रिलीज डेट येताच इतर चित्रपट मागे हटले! ‘फुकरे ३’चं प्रदर्शन लांबणीवर


Jawan Release Date Change: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या ‘ जवान‘ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या आधी देखील अनेक तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. मात्र, निर्मात्यांनी पुन्हा एकदा रिलीज शेड्यूल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेव्हा या चित्रपटाला रिलीजची नवी तारीख मिळाली, तेव्हा आधीच त्यादिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट अडचणीत सापडले आहेत. रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी अभिनीत चित्रपट ‘फुकरे ३’ची रिलीज डेट ७ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली होती. मात्र, आता याच दिवशी शाहरुख खान याचा ‘जवान’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ‘फुकरे ३’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.



Source link