
रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या वित्त अधिकाऱ्याने हा एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनुसार, चित्रपटाच्या सेटवर मोबाईल वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोणीतरी कथितरित्या व्हिडीओ चोरी करून व्हायरल केला, ज्यासाठी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ क्लिप चोरून ती व्हायरल केल्याच्या आरोपाखाली आयटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








