Jairam Ramesh on 4 Trillion Dollar Economy | भारतीय जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याच्या दाव्यावर काँग्रेसचा हल्लाबोल, म्हणाले, ‘वातावरण निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या…’ | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Jairam Ramesh on 4 Trillion Dollar Economy | भारतीय जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याच्या दाव्यावर काँग्रेसचा हल्लाबोल, म्हणाले, ‘वातावरण निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या…’ | Navarashtra (नवराष्ट्र)


भारतीय जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याच्या दाव्यावर काँग्रेसचा हल्लाबोल, म्हणाले, ‘वातावरण निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या…’

भारताच्या अर्थव्यवस्थेने ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स ओलांडल्याच्या दाव्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. जयराम रमेश यांनी याला फेक न्यूज म्हटले आहे.

काँग्रेसने सोमवारी (20 नोव्हेंबर) भारताच्या जीडीपीने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडल्याचा केंद्र सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांचा दावा खोटा ठरवला. सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढत काँग्रेसने आरोप केला की,या फेक न्यूजचा उद्देश केवळ वातावरणनिर्मिती करणे आणि मथळे तयार करण्याचा प्रयत्न आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काल रविवारी (19 नोव्हेंबर) दुपारी 2.45 ते 6.45 दरम्यान संपूर्ण देश क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यात व्यस्त होता.त्यावेळी, राजस्थान आणि तेलंगणाचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते उद्योगपती यांच्यासह मोदी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी ट्विट केले होते की, भारताचा जीडीपी आकडा प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे.’






Source link