
‘थलायवर १७०’ हा रजनीकांत यांचा आगामी चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. रजनीकांत यांनी नुकतीच या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. टीजे ज्ञानवेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या या चित्रपटाचे नाव ठरवण्यात आलेले नाही. म्हणूनच या चित्रपटाला सध्या ‘थलायवर १७०’ असे म्हटले जात आहे. ‘जेलर’ या चित्रपटाने कलेक्शनच्या बाबतीतही बाजी मारली आहे. या चित्रपटाने अवघ्या १७ दिवसांत देशभरात ३०२.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर, जगभरात हा चित्रपट ६०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटात मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांचा कॅमिओ आहे. ‘जेलर’मध्ये रजनीकांत यांच्यासोबत राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.







