
भगवान जगन्नाथाचा अंदाजे ४५ फूट उंच लाकडी रथ ओढण्यासाठी रविवारी, ७ जुलै रोजी पुरीत लाखो लोक जमले होते. हे वार्षिक आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे, ज्यामध्ये भगवान जगन्नाथ आणि देवी सुभद्रा यांचे रथ भक्तांनी ओढले आहेत. या पवित्र प्रसंगी हजारो भाविक देवाचे दर्शन घेण्यासाठी जय जगन्नाथ आणि हरिबोलचा जयघोष करत या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी सुमारे १० लाख भाविक पुरी येथील रथ यात्रेत आले झाल्याचा अंदाज आहे. चेंगराचेंगरीत शेकडो भाविक जखमी झाले आहेत. तर काही भाविकांना लहान-मोठी इजा झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. गंभीर जखमी असलेल्या भाविकांवर उपचार केले जात आहेत. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेला भाविक हा परराज्यातील असून त्या व्यक्तीबाबतची माहिती मिळालेली नाही.







