
२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत सुकेशचे संबंध होते. मात्र, जॅकलिनशिवाय नोरा फतेही आणि इतर अनेक अभिनेत्रींची नावेही त्याच्यासोबत जोडली गेली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, सुकेशने जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर तब्बल १० कोटी रुपये खर्च केले आहेत आणि जॅकलिनला देखील महागडे गिफ्ट्स दिले आहेत. सुकेश जॅकलिनला मुंबईहून चेन्नईला बोलावण्यासाठी चार्टर्ड विमान पाठवत असे, ज्यावर सुमारे ८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तुरुंगात गेल्यानंतरही सुकेश बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवत होता.








