
Jackie Shroff Birthday Special : बॉलिवूडमध्ये अनेक अप्रतिम अभिनेते आहेत, त्यापैकी काही असे आहेत की त्यांनी त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. यापैकी एक नाव जॅकी श्रॉफचेही आहे. जॅकी इतर अभिनेत्यांपेक्षा खूप वेगळा आहे, मग तो त्याच्या बोलण्यात किंवा त्याच्या पेहरावात. पण आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे जग्गूदादाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्याने १९८२ मध्ये ‘स्वामी दादा’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तो अजूनही चित्रपट जगतात सक्रिय आहे. चित्रपटांचा विषय सोडला तर, त्याचे वैयक्तिक आयुष्यही खूप रंजक राहिले आहे.