किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, पण कसं जगलो याला महत्त्व आहे! —- आयु. दादासाहेब भोसले

0
17
किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, पण कसं जगलो याला महत्त्व आहे! —- आयु. दादासाहेब भोसले

किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, पण कसं जगलो याला महत्त्व आहे! —- आयु. दादासाहेब भोसले

फलटण : कालकथित बापूराव भैरू घोरपडे यांच्या 27 व्या स्मृती दिनानिमित्त सासकल येथे त्यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना त्यांचे सुपुत्र आयु. माणिक बापूराव घोरपडे व आयुनि संजीवनी माणिकराव घोरपडे यांच्या व त्यांच्या कुटुंबीयाच्या वतीने करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे संघटक तथा पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी समता सैनिक दलाच्या असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयुष्यमान दादासाहेब भोसले यांनी भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत सांगत त्यांनी किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, पण कसं जगलो याला महत्त्व आहे असे प्रतिपादन करून कालकथित बापूराव भैरू घोरपडे यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली.

या प्रतिष्ठापनेचा विधी पूज्य भंते धम्मानंद बौधी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बौद्धाचार्य म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा सातारा जिल्हा पूर्व संघटक आयु. श्रीमंतराव घोरपडे यांनी विधीचे संचलन केले.

आयु श्रीमंतराव घोरपडे यांनी जुन्या परंपरेमधून बापूराव भैरू घोरपडे व त्याकाळी पोतराज म्हणून हिंदू धर्मातील अनिष्ट रूढीला कवटाळून बसलेल्या सर्व तत्कालीन व्यक्तींनी बौद्ध धम्माच्या दिशेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊन धम्माकडे कसा प्रवास केला याविषयी मांडणी केली. त्या सर्वांनी बौध्द धम्माचे विचार आत्मसात करून केलेल्या कार्याचा उल्लेख केला. येणाऱ्या काळात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार नियोजित पद्धतीने करण्याचा त्यांनी संकल्प केला. जुन्या जेष्ठ नागरिकांनी त्याकाळी रिपब्लिकन पक्षामध्ये केलेलं काम व त्यांची समाजासाठी असणारी तळमळ यावर भाष्य केले.

आयु.लक्ष्मण निकाळजे म्हणाले, संतांनी सुद्धा समतेचा विचार दिला. भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनीही पंचशीलाचा मार्ग दाखवला. तेव्हा आपण सर्वांनी तोच विचार अंगीकरावा. यातच स्वतः च आणि समाजाचे हीत आहे. बापूदादांनी सुद्धा हाच विचार दिला.आपले खरे दैवत भगवान बुद्ध, बाबासाहेब आणि संत आणि त्यांचा विचार हाच आहे.”
यावेळी बोलताना बौध्द धम्माचे जेष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या चार प्रकारच्या व्यक्तींमधील प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या व्यक्तीसारखं होण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आपली अस्मिता असणाऱ्या वास्तु, बुद्ध विहार, लेण्या आणि स्मारके यांचे जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यासाठी दुसऱ्या समाजातील कोणी येणार नाही तेव्हा त्याचे पावित्र आपणच राखले पाहिजे. सर्वांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यावर विशेष भर द्यावा असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास खंडाळा तालुक्याचे अध्यक्ष यशवंत खुंटे (आप्पा), वंचित बहुजन आघाडीचे माजी सातारा जिल्हा पूर्व अध्यक्ष भीमराव घोरपडे, बौद्धाचार्य जेष्ठ धम्मसेवक संजय घोरपडे, भानुदास घोरपडे, जगन्नाथ घोरपडे, मंगेश अहिवळे, शेखर गायकवाड, नितीन जाधव, नितीन अहिवळे, नंदकिशोर गायकवाड, सुधाकर चाबुकस्वार, उत्तम बापूराव लोंढे, बापूराव भैरू घोरपडे यांचे नातू योगेश माणिकराव घोरपडे, दीपक माणिकराव घोरपडे, मदने व आडके परिवारातील शिष्य मंडळी, निकिता घोरपडे, सारिका घोरपडे, मंगल घोरपडे, लता घोरपडे, शीतल घोरपडे, माजी ग्रामपंचायत सदस्य उज्वला घोरपडे या ही उपस्थित होत्या. यावेळी घोरपडे परिवारातील सर्व कुटुंबीय व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.