Israel rocket attack at Church | इस्रायलचे गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरुचं! आता गाझाच्या चर्चवर रॉकेट हल्ला, 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

0
24
Israel rocket attack at Church | इस्रायलचे गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरुचं! आता गाझाच्या चर्चवर रॉकेट हल्ला, 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)


इस्रायलचे गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरुचं! आता गाझाच्या चर्चवर रॉकेट हल्ला, 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू

गाझा शहरातील एका ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर इस्रायली सैन्याने रॉकेटने हल्ला केला. रॉकेट हल्ल्यात किमान 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा (Israel Hamas War) आज 15 वा दिवस आहे. हे युद्ध दिवसेंदिवस अधिक तिव्र होताना दिसत आहे.  मंगळवारी इस्रायलने गाझा येथील रुग्णालयावर एयरस्ट्राईक (Airstrike On Hospital In Gaza) केला. या हवाई हल्ल्यात जवळपास 500 पॅलेस्टिनी ठार झाले होते. आता मिळालेल्या अपडेट नुसार,इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरूच ठेवले असून शनिवारी रात्री उशिरा, गाझा शहरातील एका ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर इस्रायली सैन्याने रॉकेटने हल्ला केला. रॉकेट हल्ल्यात किमान 16 पॅलेस्टिनी निर्वासितांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथे मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी निर्वासितांनी आश्रय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या चर्चने मृतांच्या संख्येची स्पष्ट आकडेवारी जाहीर केलेली नाही.

हे सुद्धा वाचा

गाझा हॉस्पिटलवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू

गाझावरील इस्रायली हल्ल्यादरम्यान, गाझाच्या अल अहली हॉस्पिटलवर रॉकेट हल्ल्यात शेकडो जीव गेले. या हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयावरील हल्ल्याचा संपूर्ण जग निषेध करत आहे. दुसरीकडे, जगभरात निषेध सुरू झाल्यानंतर इस्रायल समर्थक राष्ट्र असलेल्या अमेरिकेने इस्रायलने हॉस्पिटलवर हल्ला केला नसल्याचा दावा केला. हा हल्ला हमास समर्थित इस्लामिक जिहाद संघटनेने केल्याचा दावाही इस्रायलने केला आहे. इस्रायलने काही व्हिडिओ फुटेज आणि ऑडिओ क्लिप जारी करून आपले मत व्यक्त केले आहे. इस्रायलने निष्पाप गाझानवर हवाई हल्ले केल्याचा दावा हमासने केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लहान मुले आणि वृद्धांना या युद्धाचा फटका बसला आहे.






Source link