Israel- Palestine : इस्रायल-हमास दरम्यानच्या रक्तरंजित संघर्षात आत्तापर्यंत १००० ठार

0
19
Israel- Palestine : इस्रायल-हमास दरम्यानच्या रक्तरंजित संघर्षात आत्तापर्यंत १००० ठार


इस्त्रायलच्या गाझा पट्टीत इस्रायली लष्कर आणि हमास संघटनेच्या अतिरेक्यांदरम्यान गेले दोन दिवस सुरु असलेल्या सशस्त्र चकमकीत आत्तापर्यंत तब्बल १००० पेक्षा अधिक जण ठार झाल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. काल, शनिवारी पहाटे हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलच्या दिशेने एका पाठोपाठ एक रॉकेट डागून हल्ला केला होता. या हल्ल्यात इस्त्रायचे ६०० पेक्षा जास्त नागरिक ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हमासच्या रॉकेट हल्ल्यात १००० इस्त्रायली नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर इस्रायलच्या लष्कराने केलेल्या प्रतिहल्ल्यात ३७० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काल शनिवारी रॉकेट हल्ल्यानंतर पॅराग्लायडर, समुद्र तसेच रस्त्याच्या मार्गाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर हमास चे सशस्र अतिरेकी इस्रायलमध्ये घुसले होते. हे अतिरेकी दुसऱ्या दिवशी रविवारी सुद्धा इस्त्रायलमध्येच असून त्यांच्यासोबत अद्यापही चकमक सुरू असल्याचे इस्रायलच्या लष्करी सूत्रांनी सांगितले. इस्त्रायलवर गेल्या ५० वर्षांत प्रथमत असा भयानक हल्ला झाला आहे. या हल्ल्याला इस्रायली लष्कर ताकदीने तोंड देत असून हे ‘दीर्घकाळ चालणारे आणि कठीण असे युद्ध असणार आहे’ अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिली आहे.



Source link