
Israel Hamas War Update : इस्रायल हमास संघर्ष गेल्या सोळा दिवसांपासून सुरू आहे. या हल्यात आता पर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने हमासवरील हल्ले तीव्र केले आहे. सध्या इस्रायल जमिनी हल्याची तयारी करत आहे. या संघर्षात गाझा पट्टीतील हजारो नागरिक बेघर झाले असून गाझा पट्टी सोडून चालले आहेत. दरम्यान, इस्रायलने हमासवरील हल्ले तीव्र केले आहेत. काल पुन्हा एयरस्ट्राईक करण्यात आली असून यात ४०० हून अधिक नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे.








