
Ira Khan And Nupur Shikhare Wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आयरा खान हिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अतिशय साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला आहे. सँडो आणि स्पोर्ट्स हाफ पँटमध्ये स्वतःच्या लग्नात पोहोचलेल्या नुपूरला बघून आयरा खानने त्याला चांगलाच दम भरला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.







