
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज (दि.७) मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यामध्ये वानखेडे स्टेडीयमवर सामना होत आहे. दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने दमदार सुरूवात केली आहे. दिल्ली कॅपिटलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रोमॅरियो शेफर्डने झंझावती खेळी करत 10 धावांत ३9 धावा कुटल्या. या खेळीत त्यांने 4 शानदार षटकार आणि ३ चौकार ठोकले.
मुंबईला 181 धावांवर पाचवा धक्का बसला असून 39 धावा करून हार्दिक बाद झाला आहे.
टीम डेव्हिड आणि हार्दिक पंड्या यांची 28 चेंडूत अर्धशतकी भागीदारी
मुंबई संघाच्या 15 षटकांत 4 बाद, 138 धावा झाल्या आहेत. टीम डेव्हिड 4 धावांवर आणि हार्दिक पंड्या 31 धावांवर खेळत आहेत,
तिलक वर्मा 6 धावांवर खलील अहमदच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलकडे झेल देऊन बाद झाला.
मुंबईच्या 12 षटकांत 120 धावा झाल्या असून तीन फलंदाज बाद झाले आहेत.
मुंबईची तिसरी विकेट- अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर ईशान किसन ४२ धावांवर झेलबाद झाला.
मुंबईच्या 9 षटकांत २ बाद 92 धावा झाल्य़ा आहेत.
मुंबईला सलग दुसरा धक्का, ॲनरिक नॉर्टजेच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार झेलबाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही.
मुंबईला पहिला धक्का, रोहितचे अर्ध शतक हुकले, ४९ धावांवर खेळत असताना फिरकीपटू अक्षर पटेलने सातव्या षटकात रोहितला क्लीन बोल्ड केले.
पॉवर प्लेमध्ये ७५ धावा केल्या. रोहित शर्मा 49 धावा, तर ईशान २५ धावावर खेळत आहे.
५ षटकांमध्ये ६० धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि ईशान किसन यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली.
The post शेफर्ड वादळात दिल्ली भुईसपाट; मुंबईचे 235 धावांचे आव्हान appeared first on पुढारी.