Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाIPL 2024 : श्रेयस अय्यर देणार KKRला धक्का? IPLचे सुरुवातीचे सामने न...

IPL 2024 : श्रेयस अय्यर देणार KKRला धक्का? IPLचे सुरुवातीचे सामने न खेळण्याची शक्यता | पुढारी

IPL 2024 : श्रेयस अय्यर देणार KKRला धक्का? IPLचे सुरुवातीचे सामने न खेळण्याची शक्यता | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होणार आहे. आगामी हंगाम सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्याच दरम्यान कोलकाता नाईट रायडर्ससाठी (kolkata knight riders) वाईट बातमी समोर आली आहे. वास्तविक, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. ज्यामुळे कोलकाता संघाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. केकेआर 23 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

श्रेयस अय्यरने (shreyas iyer) नुकताच रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला. विदर्भाविरुद्ध मुंबई संघाकडून खेळताना त्याने सामन्याच्या दुसऱ्या डावात 95 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याला पाठीचा त्रास पुन्हा निर्माण झाला. गेल्या वर्षीच त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. ज्यामुळे आयपीएल 2023 मध्येही तो खेळू शकला नव्हता. तेव्हा त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व नितीश राणाने केले होते. आता पुन्हा 2024 च्या हंगामापूर्वी अय्यरच्या जुन्या दुखापतीने केकेआरची चिंता वाढली आहे. श्रेयस हा केकेआरचा कर्णधार आहे आणि सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो न खेळणे हे संघासाठी धोक्याची घंटा असेल, असे जाणकरांचे मत आहे.

अय्यरने (shreyas iyer) 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून, त्याने 101 आयपीएल सामने खेळले असून 125 च्या स्ट्राइक रेटने 2776 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 19 अर्धशतके आहेत.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments