Tuesday, September 15, 2026
Homeसाताराश्वास संस्थेचा पुढाकार: गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी स्पीकिंग कोर्सची सुरुवात

श्वास संस्थेचा पुढाकार: गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी स्पीकिंग कोर्सची सुरुवात

फलटण :श्वास बहुउद्देशीय विकास संस्था, फलटणने गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पुढाकार घेतला आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात, संस्थेने मोफत इंग्रजी स्पीकिंग कोर्स सुरू करण्याची घोषणा केली होती. आता, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवे मार्ग खुले करण्याचा उद्देश आहे.

हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असून, संस्थेचा हेतू गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवून त्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्याचा आहे. तीन महिन्यांच्या या कोर्समध्ये तज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन दिले जाणार आहे.

समाजातील बांधवांकडून या उपक्रमासाठी आर्थिक योगदानाचे आवाहन करण्यात आले असून, त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे.

संस्थेने काल पेठेमधील काही भीमसैनिकांना भेटून विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी नमुना अर्ज वितरित केले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरून भीम सैनिक किंवा श्वास संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधावा, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ होईल.

संपर्कासाठी व्यक्ती:

  • मंगेश सावंत: 9881344783
  • कपिल काकडे: 8329433291
  • चंद्रकांत मोहिते: 9284869175
  • मुकेश अहिवळे: 8483095494
  • शुभम अहिवळे: 9284947822

जय भीम!
श्वास बहुउद्देशीय विकास संस्था, फलटण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments