
Indians in France : दुबईहून भारतीय नागरिकांना घेऊन निकाराग्वाला जाणारं एक विमान फ्रान्सच्या सुरक्षा रक्षक यंत्रांनी ताब्यात घेतले होते. यात तब्बल ३०३ भारतीय होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या विमानातून मानवी तस्करी होत असल्याचा संशय असल्याने हे विमान रोखण्यात आले होते. अखेर ४ दिवसानंतर हे विमान या प्रवाशांना घेऊन मायदेशी परतले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हे विमान मुंबई विमानतळावर उतरले.







