
चार वर्षांपूर्वी रेल्वे भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलती मागे घेतल्यानंतर भारतीय रेल्वेने 5800 कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त केला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार कायद्याच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी रेल्वे भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलती मागे घेतल्यानंतर भारतीय रेल्वेने 5800 कोटी रुपयांहून अधिक महसूल प्राप्त केला आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार कायद्याच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सवलत मागे घेतली होती.
याआधी रेल्वे महिला प्रवाशांना ट्रेनच्या भाड्यात 50 टक्के आणि पुरुष तसेच ट्रान्सजेंडर ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना 40 टक्के सवलत देत असे. रेल्वेच्या नियमांनुसार, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि ट्रान्सजेंडर आणि 58 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना ज्येष्ठ नागरिक मानले जाते. रेल्वेने सवलत सुविधा मागे घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना इतर प्रवाशांच्या बरोबरीने रेल्वे प्रवासाचे पूर्ण भाडे द्यावे लागत आहे.









