
या जहाजावर २३ पाकिस्तानी नागरिक होते. या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने राबवलेले ऑपरेशन जवळपास १२ तास चालले.
Indian Navy Performance : भारतीय नौदलाकडून आज प्रशंसनीय कामगिरी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मोठी कारवाई करीत इराणच्या जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सोडविले आहे. भारतीय नौदलाने शुक्रवारी उशिरा याबाबत माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे या जहाजावर २३ पाकिस्तानी नागरिक होते. या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने १२ तासांचे ऑपरेशन राबवले.
दोन युद्धनौका जहाजाच्या दिशेने वळवल्या










