
Indian Idol 14 Winner Prize Money: नुकताच ‘इंडियन आयडॉल‘च्या १४व्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडला. ‘इंडियन आयडॉल’च्या १४व्या पर्वाला त्यांचा विजेता मिळाला आहे. कानपूरचा गायक वैभव गुप्ता याने ‘इंडियन आयडॉल १४’च्या विजेतेपदाचा खिताब जिंकला आहे. या शोमध्ये शेवटपर्यंत टिकून राहिलेल्या यादीच्या ‘टॉप ६’ फायनलिस्ट होते, ज्यात वैभव गुप्ता, सुभदीप दास, आद्य मिश्रा, अंजना पद्मनाभन, पीयूष पनवार आणि अनन्या पाल यांचा समावेश होता. तर, वैभव गुप्ता याने या पाच जणांना मागे टाकून ‘इंडियन आयडॉल १४’ या शोची ट्रॉफी जिंकली आहे.







