
पुढारी ऑनलाईन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून धर्मशाळा येथे होत आहे. यासाठी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने आघाडीवर आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सलग ३ सामने जिंकले आणि आता त्यांना ११२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. पण, इंग्लंडला किमान पाचवी कसोटी जिंकून इभ्रत वाचवण्याची संधी आहे.
इंग्लंडला ६४ धावांवर पहिला धक्का
इंग्लंडला पहिला धक्का 64 धावांवर बसला. कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डकेटचा शुभमन गिलने डकेटचा अप्रतिम झेल घेतला.
Catching game 🔛 point! ⚡️ ⚡️
Follow the match ▶️ https://t.co/jnMticF6fc #TeamIndia | #INDvENG | @ShubmanGill | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GnC6gYNaOs
— BCCI (@BCCI) March 7, 2024
देवदत्त पडिक्कलचे कसोटीत पदार्पण….
बुधवारी ६ मार्च टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान रजत पाटीदारच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. यामुळे तो पाचव्या कसोटीसाठी खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देवदत्त पडिक्कल आजच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण करत आहे. (India vs England 5th Test)
टीम इंडियाची Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्ता पडिक्कल, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रूव जुरेल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
A look at #TeamIndia‘s Playing XI for the 5th and final #INDvENG Test!
Devdutt Padikkal makes his Test Debut 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/OwZ4YNua1o@IDFCFIRSTBank pic.twitter.com/TvFY7L9CjB
— BCCI (@BCCI) March 7, 2024







