India vs England 4th Test : रांची कसाेटीतील दुसरा दिवस इंग्‍लंडचा, टीम इंडिया ७ बाद २१९ | पुढारी

0
13
India vs England 4th Test : रांची कसाेटीतील दुसरा दिवस इंग्‍लंडचा, टीम इंडिया ७ बाद २१९ | पुढारी


पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जो रूटच्‍या शतकी खेळीच्‍या जाेरावर  पहिल्या डावात 353 धावांपर्यंत मजल मारली.  इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आज (दि.२४) दुसर्‍या दिवशी भारतीय संघ मैदानावर मैदानात उतरला;पण इंग्‍लंडच्‍या फिरकीपटूसमोर यशस्‍वी जैस्‍वाल वगळता अन्‍य फलंदाजांनी नांगी टाकली. अखेर दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा भारताने ७ गडी गमावत २१९ धावा केल्‍या आहेत. टीम इंडिया अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे.  इंग्‍लंडच्‍या शोएब बशीर याने ४, टॉम हार्टले याने २ तर जेम्‍स अँडरसन याने १ विकेट घेतली. ( India vs England 4th Test Day 2 Score)

India vs England 4th Test Day 2 Score : इंग्‍लंडचा दुसरा डाव ३५३ धावांवर आटाेपला

आज इंग्लंडने सात बाद 302 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. 51 धावांची भर घालताना संघाने उर्वरित तीन विकेट गमावल्या. रवींद्र जडेजाने उर्वरीत तिन्ही विकेट घेतल्या. इंग्लंडला 347 च्या स्कोअरवर आठवा धक्का बसला. रवींद्र जडेजाने ऑली रॉबिन्सन आणि जो रूट यांच्यातील १०२ धावांची भागीदारी मोडली. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. यांनतर रॉबिन्सन 96 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. त्याला जडेजाने यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद करत इंग्‍लंडचा डाव गुंडाळला. इंग्‍लंडच्‍या पहिल्‍या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4, आकाश दीप 3, मोहम्मद सिराज 2 आणि अश्विनने 1 विकेट घेतली.
(India vs England 4th Test Day 2 Score)

यशस्‍वी जैस्‍वालची ७७ धावांची खेळी, शोएब बशीरने दिवस गाजवला

चार धावांवर भारताला पहिला धक्‍का बसला. जेम्स अँडरसनच्या चेंडूवर दोन धावा काढून कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. अँडरसनने रोहितला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. लंच ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात एक गडी गमावून 34 धावा केल्या होत्‍या. लंचब्रेकनंतर भारताला दुसरा धक्का ८६ धावांवर बसला. शोएब बशीरने शुभमन गिलला पायचीत ( एलबीडब्ल्यू)  केले. त्याने 38 धावांची खेळी केली. करता आल्या. शुभमनने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदारच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. त्याला इंग्लंडचा गोलंदाज शोएब बशीरने बाद केले. रजतने आपल्या खेळीत 42 चेंडूत 17 धावांची खेळी केली. 37 व्या षटकात भारताचा शोएब बशीरने ओली पोपकरवी जडेजाला झेलबाद केले. त्‍याने १२ चेंडूत 12 धावा केल्या. (India vs England 4th Test Day 2 Score)

१६१ धावांवर भारताचा निम्‍मा संघ तंबूत

४७ व्या षटकांत भारताला पाचवा मोठा धक्का बसला. शोएब बशीर याने यशस्वी जैस्वालला बाद केले. यशस्वी ११७ चेंडूत ७३ धावा काढून माघारी परतला. यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. या मालिकेतील हा त्याचा ५०+ चा चौथा स्कोअर आहे. यानंतर भारताला सलग दाेन धक्‍के बसले. भारताला सरफराज खानच्या रुपाने सहावा धक्का बसला. त्याला टॉम हार्टलेने ५२ व्या षटकात झेलबाद केले. सरफराजला ५३ चेंडूत केवळ १४ धावा करता आल्या.  ५६ व्‍या षटकात १७७ धावांवर भारताला सातवा धक्‍का बसला. फिरकीपटू टॉम हार्टलेने अश्‍विनला पायचीत केले. (India vs England 4th Test Day 2 Score)

कुलदीप आणि ध्रुवची ४२ धावांची भागीदारी

अश्‍विन बाद झाल्‍यानंतर ध्रुव जुरेल याला कुलदीप यादव याने साथ दिली. दोघांनी ४२ धावांची महत्त्‍वपूर्ण भागीदारी करत टीम इंडियाचा धावफलक हालता ठेवला. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्‍हा भारताने ७ गडी गमावत २१९ धावा केल्‍या आहेत. ध्रुव जुरेल (३०) तर कुलदीप यादव हा १७ धावांवर खेळत आहेत. भारत अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे.आज इंग्‍लंडच्‍या शोएब बशीर याने ४, टॉम हार्टले याने २ तर जेम्‍स अँडरसन याने १ विकेट घेतली.

हेही वाचा :

 





Source link