
या दरम्यान, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर नागपूरचे समन्वयक दिनेश मंडपे यांनी या महिलेच्या कुटुंबीयांशी अवयवदानासाठी संपर्क साधला. त्यांनी त्यांना अवयव दानाचे महत्व पटवून सांगितले. यानंतर या महिलेचे हृदय हे पुण्यात आणण्यात आले. शुभंगीने तब्बल चार जणांना अवयव दान दिले. तिचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड दान करण्यात आले. पुण्यात एक तर नागपुरात तिघांना तिचे अवयव दान करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने ट्विट करून दिली आहे.



