Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाIND vs SA Test : भारताला सलग तीन धक्के, रोहित, जैस्वाल, शुबमन...

IND vs SA Test : भारताला सलग तीन धक्के, रोहित, जैस्वाल, शुबमन माघारी | पुढारी

IND vs SA Test : भारताला सलग तीन धक्के, रोहित, जैस्वाल, शुबमन माघारी | पुढारी

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात टॉस जिंकत द. आफ्रिकेनेप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या सुरुवातीला सलग तीन धक्के बसले. सुरुवातीला रोहित शर्मा ५ धावावर आउट झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल याला नांद्रे बर्गरने झेलबाद केले. यशस्वी १७ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर शुबमन गिल २ धावा काढून तंबूत परतला. सध्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानावर खेळत आहेत.

या सामन्यातून शार्दुल ठाकूर पुनरागमन करत आहे. तर, प्रसिद्ध कृष्णा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. भारतीय संघात रवींद्र जडेजा विश्रांती देत रवीचंद्रन अश्लिनला संघात स्थान दिले आहे. यासह द. आफ्रिकाकडून डेव्हिड बेडिंगहॅम आणि नांद्रे बर्जर यांनी द. आफ्रिकेकडून पदार्पण केले आहे. (IND vs SA Test)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून (२६ डिसेंबर) सुरुवात होत आहे. टीम इंडियाला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. येथील खेळपट्टीचा वेगवान गोलंदाजांना फायदा होतो. भारताने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले असून यात एक विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यांनामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सेंच्युरियन कसोटीचे पहिले दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे. अशा स्थितीत येथे प्रथम खेळणाऱ्या संघासमोर आव्हान असेल. (IND vs SA Test)

सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिका आजपासून सुरूवात होत आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.  सामन्यात वरूण राजाने हजेरी लावल्याने टॉसला विलंब झाला. सततच्या पावसामुळे सेंच्युरियनमधील मैदान ओले झाले. जोरदार पावसामुळे मैदानावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे.  यामुळे टॉसला विलंब झाला.

सेंच्युरियनमध्ये भारताचे आव्हान तीन मुख्य गोष्टींवर अवलंबून असेल. कर्णधार रोहित शर्माचे त्याच्या पुल आणि हुक शॉट्सवर कोणते नियंत्रण ठेवू शकतो की नाही? दुसरे म्हणजे, विराट कोहली ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणार्‍या चेंडूंशी छेडछाड करतो की नाही आणि तिसरे म्हणजे, मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो.

 

हेही वाचा :



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments