Ind vs Eng 5th Test Day 3 : इंग्लंडला पहिला झटका; झॅक क्रॉली बाद | पुढारी

0
2
Ind vs Eng 5th Test Day 3 : इंग्लंडला पहिला झटका; झॅक क्रॉली बाद | पुढारी


पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर आटोपला असून भारताला २५९ धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताने आठ विकेट्सवर ४७३ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. आज भारताला पहिला धक्का कुलदीप यादवच्या (३०) रूपाने बसला. जेम्स अँडरसनने कुलदीपला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. त्याचवेळी शोएब बशीरने बुमराहला (२०) यष्टीचीत करून भारताचा डाव ४७७ धावांवर संपुष्टात आणला. आता भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडने दुसऱ्या डावाची सुरूवात केली आहे.

इंग्लंडला पहिला झटका; झॅक क्रॉली बाद

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या ६ व्या ओव्हरमध्ये झॅक क्रॉलीला सर्फराजकरवी झेलबाद करत अश्विनने इंग्लंडला पहिला झटका दिला. क्रॉलीने आपल्या खेळीत १६ बॉलमध्ये १ धाव करता आली.

अँडरसन ७०० बळी घेणारा जगातील तिसरा गोलंदाज

इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटीत ७०० बळी पूर्ण केले आहेत. धर्मशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी त्याने कुलदीप यादवला बाद करत ही खास कामगिरी केली. हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला वेगवान आणि एकूण तिसरा गोलंदाज आहे. केवळ मुथय्या मुरलीधरन (८००) आणि शेन वॉर्न (७०८) यांनी त्याच्यापेक्षा जास्त कसोटी बळी घेतले आहेत.

भारताला नववा धक्का, कुलदीप आउट

भारताची धावसंख्या नऊ गड्यांच्या मोबदल्यात ४७७ धावा आहे. बुमराहसह कुलदीपने ४९ धावांची भागीदारी केली.

दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने डबल धमाका केला होता. भारताकडून शुक्रवारी दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकण्यात आली. कर्णधार रोहित शर्मान १०३ तर शुभमन गिलने ११० धावांची खेळी केली, त्यानंतर दोन युवा फलंदाजांनी अर्धशतके केली, सर्फराज खानने ५६ धावांची आक्रमक खेळी केली. त्याला देवदत्त पडिक्कलने १०३ चेंडूत ६५ धावा करत चांगली साथ दिली.

धावफलक :

इंग्लंड प. डाव : ५७.४ षटकांत सर्वबाद २१८ धावा.

भारत प. डाव : यशस्वी जैस्वाल यष्टिचित फोक्स गो. बशीर ५७, रोहित शर्मा त्रि. गो. बेन स्टोक्स १०३, शुभमन गिल त्रि. गो. अँडरसन ११०, देवदत्त पडिक्कल त्रि. गो. शोएब बशीर ६५, सर्फराज खान झे. रूट गो. शोएब बशीर ५६, रवींद्र जडेजा पायचित गो. हार्टली १५, ध्रुव ज्युरेल झे. डकेट गो. बशीर १५, आर. अश्विन त्रि. गो. हार्टली ०.

गडी बाद क्रम : १/१०४, २/२७५, ३/२७९, ४/३७६, ५/४०३, ६/४२७, ७/४२७, ८/४२८.

गोलंदाजी : जेम्स अँडरसन १४-१-५९-१, मार्क वूड १५-१-८९-०, टॉम हार्टली ३९-३-१२६-२, शोएब बशीर ४४-५-१७०-४, बेन स्टोक्स ५-१-१७-१, जो रूट ३-०-८-०.



Source link