
पुढारी ऑनलाईन : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली. विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs ENG 2nd Test)
भारताला पहिला झटका, कर्णधार रोहित माघारी
सामन्यातील १८ व्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. त्याला इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बसिरने पोपकरवी झेलबाद केले. आपल्या खेळीमध्ये रोहितने ४१ चेंडूत १४ धावांची खेळी केली.
भारतीय संघात बदल
दरम्यान, दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद सिराजला बाहेर ठेवण्यात आले आहे. मालिकांचा कालावधी आणि अलीकडच्या काळात त्याने किती क्रिकेट खेळले आहे हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी तो संघात असणार आहे. तर आवेश खानला दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुन्हा सामील करुन घेण्यात आले आहे. (IND vs ENG 2nd Test)
टीम इंडियाच्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे हैदराबाद कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली होती.
A look at #TeamIndia‘s Playing XI for the 2nd #INDvENG Test 🙌
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV@IDFCFIRSTBank pic.twitter.com/fE4mYc9yfw
— BCCI (@BCCI) February 2, 2024







