IND vs END 3rd Test : भारताला दुसरा धक्का; गिल बाद | पुढारी

0
27
IND vs END 3rd Test : भारताला दुसरा धक्का; गिल बाद | पुढारी


पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आजपासून राजकोटमध्ये खेळला जात आहे. मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी असल्याने तिसरा सामना जिंकून मालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs END 3rd Test)

भारताला दुसरा धक्का; गिल बाद

24 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. मार्क वुडने प्रथम यशस्वीला तर, आता शुभमन गिललाही बाद केले आहे. आपल्या खेळीत शुभमन खातेही उघडू शकला नाही. सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि रजत पाटीदार क्रीजवर आहेत.

भारताला पहिला धक्का

पहिल्या डावात 22 धावांवर भारताला पहिला धक्का बसला. मार्क वुडने यशस्वी जैस्वालला स्लिपमध्ये जो रूटकडे झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 10 धावा केल्या. सध्या शुबमन गिल आणि रोहित शर्मा क्रीजवर आहेत.

सरफराज आणि ध्रुव जुरेलचे पदार्पण

सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. अनिल कुंबळे यांनी युवा खेळाडूंना पदार्पणाची कॅप सरफराजला दिली. तर दिनेश कार्तिकने ध्रुवकडे पदार्पणाची कॅप दिली. सर्फराज हा 311 वा तर ध्रुव कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा 312वा खेळाडू आहे. यावेळी सरफराजला पदार्पणाची कॅप दिल्यानंतर तो भावूक झाला. यावेळी त्याचे प्रशिक्षक आणि वडील नौशाद खानही तिथे उपस्थित होते.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, जेम्स अँडरसन, रेहान अहमद, मार्क वुड.

हेही वाचा :





Source link