
भारतीय बौद्ध महासभा सातारा (पूर्व)ची मासिक बैठक संपन्न
फलटण : भारतीय बौद्ध महासभा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आपली मातृसंस्था आहे. त्यामुळे संस्थेचे काम गावांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये पोचवण्यासाठी आपल्याला नव्या उमेदीच्या तरुण पदाधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. वर्षानुवर्षे तेच तेच पदाधिकारी शाखांमध्ये काम करताना दिसत आहेत. जुन्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत नव्या व तरुण पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन त्यांच्या खांद्यांवर धम्माची धुरा देऊन आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले पाहिजे. एका बाजूला धर्मांधता बोकाळली असताना आपल्याला आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रामनेर शिबिरे समता सैनिक दल शिबिरे उपासिका शिबिरे युवक युवती शिबिरे अशी 24 प्रकारची संस्थेने दिलेली शिबिरे राबवण्याची गरज आहे आणि त्यासाठी तरुण पदाधिकाऱ्यांची निवड करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. ते भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पुरवठा मासिक मीटिंग मध्ये बोलत होते.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत सातारा (पूर्व) जिल्ह्याची मासिक बैठक (सह विचार सभा) आज दि. १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता बुद्धविहार, कोळकी (ता. फलटण) येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीस प्रमुख उपस्थिती राज्याचे संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर,पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी आयु. दादासाहेब भोसले, अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आयु. नानासाहेब मोहीते होते. बैठकीस जिल्हा सरचिटणीस आयु. सुनिल कदम,सातारा जिल्हा पूर्वचे समता सैनिक दलाचे संरक्षण उपाध्यक्ष संपत भोसले, संघटक आयु.अर्जुन ननावरे, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे यांच्यासह माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव तालुक्यांतील अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर व अजिव सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरवातीला संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या शहिदांना आदरांजली वाहण्याचा ठराव मांडला. त्या ठरावाला सातारा जिल्हा पूर्वचे सरचिटणीस सुनील कदम यांनी अनुमोदन दिले व त्या सर्व शहिदांना दोन मिनिटे आदरांजली वाहून सहविचार सभेची सुरुवात झाली.
मासिक मीटिंगची प्रास्ताविक सातारा जिल्हा पूर्वचे सरचिटणीस आयु. सुनील कदम यांनी केले. त्यांनी आजच्या मासिक मीटिंग चे सर्व विषय व राज्य व केंद्राकडून आलेल्या सूचनांचं आपल्या प्रास्ताविकात विवेचन करून माहिती सादर केली.बैठकीत वितरित करण्यात आलेल्या धम्मयान दिनदर्शिकेच्या धम्मदान मूल्य संकलनाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे होणाऱ्या भारतीय बौद्ध महासभेच्या विभागीय बैठकीबाबत सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले.
दि. १८ जानेवारी २०२६ रोजी खंडाळा येथे होणाऱ्या धम्म परिषदेस भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब उपस्थित राहणार असल्याने त्या कार्यक्रमाच्या तयारीबाबतही सखोल विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते म्हणाले, ” भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था आहे. आपण इथे कोणत्याही पदासाठी किंवा मानसनमानासाठी काम करत नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या धम्म संस्थेच्या वतीने धम्माचा प्रचार प्रसार व भारत बुद्धमय करण्यासाठी आपला आपण खारीचा वाटा उचलत आहोत. कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून संस्थेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. हे करत असताना संस्थेच्या ध्येयधोरणांवर कोणत्याही प्रकारे आघात होणार नाही याचीही काळजी घ्यावी. संस्थेने सांगितलेली 24 प्रकारची शिबिर घ्यावीत यासाठी सातारा जिल्हा पूर्व शाखेकडून आपल्याला सर्वतोपरी मदत मिळेल. “
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे सरचिटणीस सुनील कदम यांनी सांगितले की, “फॅसिस्ट विचारसरणी किंवा धर्मांधता कमालीची वाढलेले असताना समता सैनिक दलाचे प्रमुख तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे दोघेही एकत्र येऊन राजकीय सत्ता समाजाच्या हाती येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपणही सनातनी मनुवादी पक्षांमध्ये काम करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षांमध्ये सन्मानाने अभिमानाने काम करावे. “
शेवटी नुकताच जाहीर झालेल्या बौद्धाचार्य परीक्षेत यशस्वी झालेल्या फलटण मधून आयु. भीमराव लोंढे, खटाव मधून स्वप्नील कांबळे, कोरेगाव मधून राजाराम जयराम कांबळे, निलेश मोरे या सर्व भावी बौद्धाचार्यांचे राज्याचे संघटक समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व सातारा व पुणे जिल्हा प्रभारी आयोग दादासाहेब भोसले सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते व सरचिटणीस आयु.सुनील कदम यांनी सर्व नूतन बौद्धाचार्यांचे अभिनंदन केले व पुढील धम्म कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी राज्याचे संघटक समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व सातारा व पुणे जिल्हा प्रभारी आयोग दादासाहेब भोसले सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष नानासाहेब मोहिते व सरचिटणीस आयु.सुनील कदम, सातारा जिल्हा पूर्व चे संपत भोसले संरक्षण उपाध्यक्ष आयु. संपत भोसले, सातारा जिल्हा पूर्व चे संघटक अर्जुन ननावरे, संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, खटाव तालुका अध्यक्ष बबन जगताप, खंडाळा तालुका अध्यक्ष यशवंत खुंटे, कोरेगाव तालुका अध्यक्ष राजाराम कांबळे, माण तालुका सरचिटणीस आयु.अरविंद बनसोडे, फलटण तालुका कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, मिलिंद माने, संजय भोसले, निलेश मोरे यावेळी उपस्थित होते.
बैठक शांततेत व संघटनात्मक वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.








