
सध्या जेलमध्ये कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपती पदासाठी अर्ज भरला आहे. इम्रान खान यांच्या मार्फत ‘तहरिक-ए-इन्साफ’ पक्षाचे ब्रिटनस्थित प्रवक्ते सैय्यद झुल्फिकार बुखारी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाकडे हा अर्ज सादर केला असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. ‘पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, पाकिस्तानातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ‘तहरिक ए इन्साफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष, अष्टपैलू क्रिकेटपटू राहिलेले इम्रान खान हे सध्या जेलमध्ये कैद असून जेलमधूनच ते ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपतीपदाची निवडणूक लढवणार आहे.’ असं तहरिक ए इन्साफच्या सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आले आहे.







