Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट - वंचित बहुजन आघाडीची निवडणूक प्रचार मोहीम...

प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट – वंचित बहुजन आघाडीची निवडणूक प्रचार मोहीम सुरू

पुणे:वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातडीने उपचारादरम्यान त्यांच्या हृदयात रक्ताची गाठ असल्याचे समोर आले आहे आणि त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे. पक्ष प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील 3 ते 5 दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना, पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर आजारी असल्याचे कळताच कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आंबेडकर कुटुंबियांनी सर्वांशी विनंती केली आहे की, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा.

प्रकाश आंबेडकरांच्या गैरहजेरीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम व संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवसांतील प्रचाराचे नियोजन होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments