Immoral Relationship | महिलेचा आचाऱ्यावर जडला जीव; प्रियकराच्या मदतीने पतीचाच काढला काटा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Immoral Relationship | महिलेचा आचाऱ्यावर जडला जीव; प्रियकराच्या मदतीने पतीचाच काढला काटा | Navarashtra (नवराष्ट्र)


महिलेचा आचाऱ्यावर जडला जीव; प्रियकराच्या मदतीने पतीचाच काढला काटा

उत्तराखंडमधल्या डेहराडून इथून अनैतिक संबंधातून खून झाल्याची (Murder in Uttarakhand) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न सोहळ्यादरम्यान तिथल्या आचाऱ्याशी एका महिलेचे संबंध जुळले आणि त्यातून तिने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून (Husband Murder) केला.

डेहराडून : उत्तराखंडमधल्या डेहराडून इथून अनैतिक संबंधातून खून झाल्याची (Murder in Uttarakhand) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न सोहळ्यादरम्यान तिथल्या आचाऱ्याशी एका महिलेचे संबंध जुळले आणि त्यातून तिने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून (Husband Murder) केला. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ही महिला आणि तिच्या प्रियकराला अटक (Lover Arrest) करण्यात आली आहे.

डाकपत्थर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जलालिया पीर परिसरात यमुना नदीमध्ये 19 ऑक्टोबरला एक मृतदेह सापडला होता. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. पण त्यावेळी मृताची ओळख पटली नव्हती. त्याच्या गळ्यावर काही खुणा आढळल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी मृतदेहाची ओळख पटली. अरुण कुमार उर्फ जुगनू असे मृतकाचे नाव असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याचा भाऊ नितीनच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.






Source link