IFFI Goa news : ‘फिल्म इंडस्ट्रीत अपयश हीच यशाची पहिली पायरी असते’ : मधुर भांडारकर

0
82
IFFI Goa news : ‘फिल्म इंडस्ट्रीत अपयश हीच यशाची पहिली पायरी असते’ : मधुर भांडारकर


प्रवीण गांगुर्डे, पणजी (गोवा)

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक मधुर भांडारकर यांनी गोव्यात सुरू असलेल्या ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इन कॉन्व्हर्सेशन’ सत्रात भाग घेतला. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्याशी भांडारकर यांनी उत्स्फूर्त संवाद साधला. भांडारकर यांनी यावेळी सिनेमाची कला, त्यातले बारकावे, कथा सादरीकरण तसेच त्यांच्या चित्रपट निर्मिती मागची प्रेरणा या विविध विषयांवर आपले विचार मांडले. ‘चित्रपटाची निर्मिती एका कल्पनेतून होते. सिनेमॅटिक नात्यात वास्तववादी चित्रपटाला स्थान आहे. वास्तववादी तत्वामध्ये कलात्मक आणि व्यावसायिक पर्यायी प्रभावशाली असण्याची दुहेरी कसरत स्वीकारतानाच मनाला भिडण्याची शक्ती असते. आपल्याला समाजातूनच चित्रपट कथेसाठी प्रेरणा मिळते’ असे भांडारकर यावेळी म्हणाले.



Source link