फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

0
26
फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार

फलटण | दि. ५ जुलै २०२५ :- फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांचं पुर परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण, तसेच संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन व सोहळ्यानंतर पालखी तळ परिसरात केलेल्या स्वच्छतेबद्दल महायुतीकडून गौरव करण्यात आला.

हा सत्कार मा. खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. नगर परिषदेचे कर्मचारी, अधिकारीवर्ग तसेच महायुतीचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महायुतीच्या वतीने श्री. मोरे यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार श्री. नाईक निंबाळकर म्हणाले की, “फलटण नगर परिषदेकडून दिलेली सेवा व नियोजन कौतुकास्पद असून, हे शहर पालखी सोहळ्याच्या दृष्टीने आदर्श ठरत आहे.”

या सत्कार सोहळ्यावेळी महायुतीचे शहर व तालुकास्तरावरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.