सोलापूरच्या क्रीडा विकासात ऐतिहासिक पाऊल!पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन

0
5
सोलापूरच्या क्रीडा विकासात ऐतिहासिक पाऊल!पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन

सोलापूर साहस Times : सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आज एक नवीन पर्व सुरु झाले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका येथे उभारण्यात येणाऱ्या 400 मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले.

जिल्हा क्रीडा संकुल समिती सोलापूर आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक (पुणे) यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, प्रभारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार तसेच क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ट्रॅकच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलातील प्रशिक्षण व स्पर्धा अधिक दर्जेदार व सर्वसमावेशक होणार आहेत. शासन क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे आणि सोलापूरच्या क्रीडा वारशाला राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.